हातातील कमळ बाजूला ठेवून भाजप जिल्हा उपाध्यक्षांनी मनगटाला बांधलं शिवबंधन!

Mumbai Shiv sena vs BJP : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थित होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Sep 24, 2022 | 1:56 PM

मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीर एक महत्त्वपूर्ण घडमोड समोर आली आहे. भाजपच्या (BJP Mumbai) मुंबई जिल्हा उपाध्यक्षांनी हातातील कमळ बाजूला ठेवलं आणि मनगटाला शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत भाजपला फटका बसतो का, यावरुन आता तर्क वितर्क लढवले जात आहेत. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी शिवसेनेत (Shivsena News) प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थित होते. मुंबई जिल्हा भाजपच्या उपाध्यक्ष ज्योत्सना दिघे यांनी भाजपात प्रवेश केलाय. यावेळी दिघे यांचे समर्थकांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें