Narayan Rane : 20+0 बरोबर किती? खोचक सवाल करत राणेंचा एकत्र येण्याच्या चर्चांवरून ठाकरे बंधूंना टोला
'भाजपसहित युती आघाडी होईल ते जिंकतील किंवा नुसतं एकटं भाजप लढलं तरी विजय होईल', अस नारायण राणे म्हणाले आणि त्यांनी राज -उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर पुन्हा टोला लगावला आहे.
गेल्या काही दिवसापासून अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून भाजप नेते मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा खोचक टोला लगावला आहे. २० अधिक शून्य बरोबर किती? असा सवाल करत नांदीचा काय फरक पडणार? असंही नारायण राणे म्हणाले आहेत. पुढे राणे असेही म्हणाले, भाजपचे १३४ आणि महायुतीत तिघांचे मिळून २०० आमदार या सगळ्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठिंबा आहे. त्यामुळे काही फरक पडत नाही. तर नारायण राणे यांनी केलेल्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे. ‘२० वर एक शून्य लागून २०० चा आकडाही होऊ शकतो’, असं अंबादास दावने म्हणालेत.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

