AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी

अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी

| Updated on: May 05, 2026 | 4:16 PM
Share

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येतंय. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. आता बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येतंय. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. यादरम्यान अनेक ठिकाणी भाजप नेते आजही जल्लोष करताना दिसत आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले. आता बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची बंगालचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात विजयी पक्ष मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी एखाद्या प्रभावशाली नेत्याची निवड करू शकतो. भाजपने अमित शहा यांची निरीक्षक, तर ओडीशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची उपनिरीक्षक म्हणून निवड केली आहे. लवकरच बंगालचं मुख्यमंत्री पद कोणाला मिळेल हे ठरणार असून शपथविधी ९ तारखेला होईल.

Published on: May 05, 2026 04:16 PM
Follow Us