AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar | सरकारविरोधातला एल्गार भाजप आणखी तीव्र करेल : आशिष शेलार

| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 6:44 PM
Share

फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षण कोर्टात चालले. या सरकारच्या काळात का टिकले नाही. न्यायालयात महाविकास आघाडी मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर मांडणी करण्यात अयशस्वी ठरली, असे आशिष शेलार म्हणाले. (BJP's elgar against government will intensify, warns Ashish Shelar)

सातारा : भाजप नेते आशिष शेलार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सुरूची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यानंतर सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षात असताना आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारकर्‍यांच्या समर्थनार्थ काढलेले शब्द सत्तेत आल्यानंतर विरून गेले आहेत. सत्तेत आल्यानंतर सत्य विरून गेले अशी अवस्था उद्धव ठाकरे सरकारची झाली आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षण कोर्टात चालले. या सरकारच्या काळात का टिकले नाही. न्यायालयात महाविकास आघाडी मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर मांडणी करण्यात अयशस्वी ठरली, असे आशिष शेलार म्हणाले.