Ambernath News : थरार! अंध व्यक्ती धावत्या लोकलसमोर रुळावर पडला, त्यानंतर जे घडलं ते..
रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक अंध व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याची घटना घडली आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक अंध व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मुंबई महापालिकेचे कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे अंध असून संध्याकाळी ७च्या सुमारास अंबरनाथहून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते. लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले. याचवेळी समोरून कर्जतकडे जाणारी लोकल देखील येत होती. मात्र माने यांना प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ते थेट रेल्वे रुळावर कोसळले. यावेळी कर्तव्यावर असलेले सुरक्षा जवान अमोल देवरे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी लागलीच स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुळावर उडी घेत या अंध व्यक्तीचे प्राण वाचवले.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

