AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Train Accident : मृत्यूचा तांडव! प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार

Mumbai Local Train Accident : मृत्यूचा तांडव! प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार

| Updated on: Jun 09, 2025 | 1:35 PM

दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान झालेल्या लोकल रेल्वेच्या अपघाताचा थरार त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शिनी सांगितला आहे.

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान कसाराकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, अपघात झाला त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शीनी अपघाताचा थरार टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच एवढा मोठा अपघात बघितल्याचं यावेळी प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं आहे. 2 लोकल मुंब्रा स्थानकाजवळ असलेल्या वळणावर एकमेकांच्या अगदीच बाजूने जात असल्याने गर्दीत बाहेर लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. त्यानंतर एकामागे एक प्रवासी खाली पडण्यास सुरुवात झाली. यात एक महिला देखील असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाला ऑफिसला जाण्याची घाई असते. लोकल वेळेवर नसतात, त्यात जादा लोकल नसल्याने आहे त्यातच कसरत करत चाकरमान्यांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे सकाळच्या वेळेत नेहेमी गर्दी होते. प्रवाशांचे हाल होतात. आज झालेल्या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याच्या संतप्त भावना यावेळी घटनास्थळावर उपस्थित प्रवाशांनी व्यक्त केल्या आहे.

Published on: Jun 09, 2025 01:35 PM