AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Train Accident : दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान कसा झाला अपघात?

Mumbai Train Accident : दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान कसा झाला अपघात?

| Updated on: Jun 09, 2025 | 12:45 PM
Share

Pushpak Express Accident : दिवा मुंब्रा स्थानका दरम्यान कसारा – सीएसएमटी लोकलमधील प्रवाशांचा खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कसारा – सीएसएमटी लोकलमधील 6 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. दिवा मुंब्रा स्थानका दरम्यान ही घटना आज सकाळी घडली. त्यानंतर पुन्हा एकदा प्रवाशांच्या रेल्वेतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. हा अपघात नमका कसा झाला हे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघता येईल.

ज्यावेळी कसाराकडून सीएसएमटीकडे जाणारी आणि सीएसएमटीकडून कसाराकडे जाणारी अशा 2 वेगवान लोकल रेल्वे एका वळणावर एकमेकांच्या शेजारून जाताना दोन्ही लोकलमधले लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. त्यानंतर हे प्रवाशी दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असलेल्या जागेत पडले. तब्बल 13 प्रवासी यावेळी खाली पडले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.  यातल्या 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

Published on: Jun 09, 2025 12:43 PM