आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला, दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो

आज महिंद्रा कंपनीने बोलेरो दत्तात्रय लोहार यांना सुपूर्द केली आहे. व दत्तात्रय लोहार यांनी मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीकडे दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 24, 2022 | 10:58 PM

सांगली : सांगलीच्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी मुलाच्या हट्टा पायी जुगाड करत त्यांच्या कल्पकतेने बनवलेल्या मिनी जिप्सीमुळे (Mini Gypsy) देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची देशभरात ओळख झाली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा (Anand mahindra) यांनी चक्क बोलेरो (Bolero) देतो असे ट्विट केले. आणि आज महिंद्रा कंपनीने बोलेरो दत्तात्रय लोहार यांना सुपूर्द केली आहे. व दत्तात्रय लोहार यांनी मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीकडे दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा केला. यामुळे आज लोहार कुटुंबीय आनंदी आहेत. यावेळी बोलेरो गाडीचे पूजन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम यांनी केले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें