AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahrukh and Aryan Meet | शाहरुख खान आणि आर्यनच्या भेटीदरम्यान काय घडलं ?

| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 7:35 PM
Share

बापलेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळालेला नाही. तसंच शाहरुखनेही भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं.

मुंबई : अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता. जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली. मात्र केवळ दहा मिनिटांत दोघांना भेट आटोपती घ्यावी लागली. आर्यनचा जामीन अर्ज काल एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळल्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Goa Cruise Drugs Party) आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानला लेकाला भेटण्याची परवानगी मिळाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला. यावेळी जवळपास दहा मिनिटं दोघांमध्ये बोलणं झालं. बापलेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळालेला नाही. तसंच शाहरुखनेही भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं.

Follow Us