Omicron Variant | चाळीस वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस द्या, वरिष्ठ शास्त्रज्ञांची शिफारस

बुस्टर डोस कुणाला द्यावा, तो प्राधान्याने कुणाला द्यावा यावर काहीसे मतभेद आहेत. असे मतभेद पहिल्यांदा लस आली त्यावेळेसही झाले होते. पण 40 वर्षांपेक्षा ज्याचं वय जास्त आहे, त्यांना बुस्टर डोस द्यावा अशी मागणी लोकसभेत खासदारांनी केली होती.

महाराष्ट्रात ओमिक्रॉननं (Maharashtra Omicron News) भीती निर्माण केलेली असतानाच आता बुस्टर डोस देण्यात यावा अशी शिफारस जिनोम तज्ञांनी केंद्र सरकारल केली आहे. कर्नाटकमध्ये दोन ओमिक्रॉनचे (Karnataka Omicron Cases) रुग्ण सापडलेत. त्यातला एक आफ्रिकेला पळून गेला आहे. त्यामुळे सध्या तरी देशात एकच ओमिक्रॉनचा रुग्ण आहे. पण ह्या रुग्णाला कुठेही परदेशात न जाता ओमिक्रॉनची लागण झालीय. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडची शंका व्यक्त केली जातेय. त्यामुळेच आगामी काळात ओमिक्रॉनला रोखायचं तर ज्यांनी दोन डोस घेतलेत त्यांना बुस्टर डोस (Booster Dose) द्यावा असं इंडियन सार्स कोविड-2 जेनेटीक कन्सोर्टीयमने साप्ताहिक बुलेटीनमध्ये शिफारस केलीय. इन्साकॉग ही जिनोम व्हेरीएशन्सवर वॉच ठेवण्यासाठी केंद्रानं उभारलेल्या राष्ट्रीय प्रयोगशाळांची प्रमुख संस्था आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI