VIDEO : प्रेमासाठी काय पण… गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् थेट आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर तुम्हीही माराल डोक्यावर हात
सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी आणि किती व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही. असाच एक भन्नाट प्रकार सोशल मीडियावर समोर आला आहे. एक तरूण आपल्या गर्लफ्रेंडला बॅगेत लपवून घेऊन जात होता मात्र त्याचा हा डाव पुरता फसल्याचे पाहायला मिळाले.
प्रेमासाठी काय पण.. असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल तसेच प्रेमात कोण काय करेल याचा नेम नाही. एका मुलाने आपल्याच गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवलं आणि थेट बॉईस हॉस्टेलमध्ये आणल्याचा प्रकार पाहायला मिळालाय. मात्र या मुलाचा हा प्रयत्न चांगलाच फोल ठरला असून त्याने केलेल्या प्लानचं भांडाफोड झालंय. सध्या सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एक तरूण आपल्या गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये टाकून बॉईस हॉस्टेलमध्ये घेऊन जात होता. मात्र बॉईस हॉस्टेलमध्ये प्रवेश करताच हॉस्टेल अॅडमिनिस्ट्रेशनला या तरूणावर संशय आला. ज्यावेळी हा तरूण हॉस्टेलमध्ये शिरला तेव्हा कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून या तरूणाने आपली सुटकेस उचलून ती हॉस्टेलमधील आपल्या रूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी या सुटकेसला झटका बसला आणि ही सुटकेस उघडली आणि सुटकेसमध्ये आत बसलेल्या गर्लफ्रेंडनेही आवाज केला. त्यामुळे या तरूणाचा सगळा प्लान उघडा पडला. सुटकेसमध्ये असणाऱ्या गर्लफ्रेंडने आवाज करताच सुरक्षारक्षकाने ती सुटकेस तपासण्याचं ठरवलं तर त्यात एक मुलगी लपली असल्याचे समोर आले. सध्या याचीच सर्वत्र चर्चा होतेय.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक

