‘राष्ट्रवादीकडून मुद्दाम आणि ठरवून ब्राह्मण समाज टार्गेटवर’, कुणी केला Sharad Pawar यांच्यावर थेट आरोप?
VIDEO | 'ब्राह्मण नाही तर शिवरायांचे सासरे आणि मेहुणे स्वराज्याच्या आड आले', ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांचं ब्राम्हण महासंघाच्या मेळाव्यात केलेलं हे वक्तव्य चर्चेत, राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर काय केला थेट आरोप?
पुणे, २८ ऑगस्ट २०२३ | ब्राह्मण नाही तर शिवरायांचे सासरे आणि मेहुणे स्वराज्याच्या आड आले, असे वक्तव्य ब्राम्हण महासंघाच्या मेळाव्यात ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. तर राष्ट्रवादी पक्षाकडून मुद्दाम आणि ठरवून ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जातंय, आनंद दवे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर थेट आरोप केल्याचे समोर आले आहे. ‘जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा उल्लेख होतो, तेव्हा मुद्दाम भास्कर कुलकर्णी या एका नावावर येऊन थांबलं जात. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आडवा येणारा एक नाही 100 भास्कर कुलकर्णी कापा, स्वराज्याच्या आडव्या येणाऱ्या माणसाला जात नसते तो देशद्रोहीचं असतो. ज्यांनी महाराजांना त्रास दिलाय त्या भोसले आणि शिर्के घराण्याचा उल्लेख होत नाही, आणि मुद्दाम एका जातीपाशी येऊन हा विषय थांबवला जातो याचा निषेध असल्याचे आनंद दवे म्हणाले.
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
