तुफान पावसामुळे पूलच गेला वाहून, बीड-अहमदनगरसह 25 गावांचा संपर्क तुटला; व्हिडीओ पाहून तुम्हीही…
मुसळधार पावसामुळे बीडमधील नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. बीडमध्ये तुफान झालेल्या पावसामुळे चक्क पूल वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या कडा गावातील मुख्य महामार्गावरील पुलाचे काम सुरू असताना मुसळधार पावसामुळे पूलच गेला वाहून...
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात तुफान पावसाची बॅटिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे बीडमधील नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. बीडमध्ये तुफान झालेल्या पावसामुळे चक्क पूल वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या कडा गावातील मुख्य महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने कडा येथील कडा नदीवरील पुल वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. तर यामुळे बीड अहमदनगर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. कडा, आष्टी, आणि जामखेड तालुक्यातील तब्बल 25 गावांचा संपर्क तुटला आहे. गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांची प्रचंड वाताहत झाल्याचे पाहायला मिळत आहे. कडा गावातील पुल वाहून गेल्याने परिसरातील वाहतूक सध्या बंद आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

