Buldhana Money Distribution : मतदारांच्या थेट खिशात पैसे… उमेदवाराच्या नातेवाईकानं वाटली कॅश! Video तुफान व्हायरल
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये प्रभाग क्रमांक सात मधून ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. बुलढाण्यातच प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवाराचा नातेवाईक पैसे वाटत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता या संदर्भात निवडणूक आयोग कारवाई करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
बुलढाण्यातील खामगाव येथे भरारी पथकाने ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली, तर प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवाराचा नातेवाईक पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराचे वडील मतदारांना पैसे वाटत असल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या सर्व प्रकारांवर निवडणूक आयोग काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे चंद्रपूरमधून आलेल्या वृत्तानुसार, भाजप उमेदवाराकडूनच मतदारांना पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील पांडुरंग चिल्लावार हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजप उमेदवाराच्या घरातूनच पैसे वाटतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या सर्व घटनांमुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. निवडणूक आयोगाने या सर्व आरोपांची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

