AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana News : केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?

Buldhana News : केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?

| Updated on: Apr 17, 2025 | 2:41 PM
Share

Buldhana Mysterious Disease : बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीच्या आजारानंतर आता या रुग्णांमध्ये नखं गळतीची समस्या दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वतावरण पसरले आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावमधील बोंडगावमध्ये गेल्या साडेतीन महिन्यांपासून केस गळतीचा आजार आला आहे. या केस गळतीच्या आजाराने संपूर्ण परिसरातील नागरिक हैराण झाले होते. त्यानंतर याठिकाणी आयसीएमआरच्या पथकाने येऊन पाहणी करत काही नमुने देखील तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल मात्र अद्याप यायचा बाकी आहे. असं असतानाच आता याच ठिकाणी आणखी एका आजाराने तोंड वर काढलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील ज्या लोकांचे केस गाळले होते, त्यांच्यात आता नख गळतीची समस्या बघायला मिळत आहे. या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत. तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेल आहे.

दरम्यान, याबाबत माहिती देताना बुलढाणा आरोग्य अधिकारी (वर्ग एक) डॉ. अनिल बनकर यांनी म्हटलं आहे की, एकूण चार गावांमध्ये नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्णांमध्ये नखांची गळती होत आहे. चार गावांमध्ये सध्या एकूण 29 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे सांगण्यात आलं असल्याचं बनकर यांनी सांगितलं आहे.

Published on: Apr 17, 2025 02:41 PM