Sanjay Gaikwad : तू आमदाराला.. हरामखोर..; शिंदेच्या आमदाराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
शिवसेना शिंदे गटच्या बुलढाण्याच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शिवसेना (शिंदे गट) चे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीमुळे चर्चेत आले आहेत. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्याच्या कारणावरून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधून जेवण मागवले होते. मात्र, त्यांना दिलेल्या डाळीची दुर्गंधी आणि खराब भात यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. यानंतर त्यांनी कॅन्टीन व्यवस्थापकाला जाब विचारला आणि कोणालाही बिल भरण्यास मनाई केली. याचवेळी, बिल काउंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्याला त्यांनी कानशिलात लगावल्याचेही समोर आले आहे. या गोंधळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला असून, यामुळे गायकवाड यांच्यावर टीका होत आहे.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

