संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रगटदिन, दर्शनासाठी शेगावमध्ये भाविकांची गर्दी
गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रगटदिन असून आज त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे. गजानन महाराज मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेलाय.
बुलढाणा : संत गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन आहे. गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रगटदिन असून आज त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे. विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेगावमध्ये मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी हजारो भाविक आज शेगावमध्ये आहेत. गजानन महाराज मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेलाय. प्रकटदिनानिमित्ताने शेगाव संस्थानामार्फत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.प्रकटदिनानिमित्त राज्यभरातून अनेक भाविक महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
Published on: Feb 13, 2023 02:35 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

