Marathi Issue : केडियाचा माज तर बघा… नाही शिकणार ‘मराठी’, एकेरी उल्लेख करत राज ठाकरेंनाच चॅलेंज
मराठी विरोधातला माज केडियांनी आपल्या ट्विटमधून दाखवलाय. तीस वर्ष मुंबईत राहून सुद्धा मराठी येत नाही काय करायचं बोला अशा एकेरी शब्दात केडियांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय.
मराठी वरून आता व्यवसायिकाचीच मग्रुरीची भाषा सुरु झाली आहे. मुंबईतले व्यवसायिक सुशील केडियांना एवढा माज आलाय की तीस वर्षांपासून मुंबईत राहतो पण मराठी येत नाही असं ट्विट जाहीरपणे करतायत. विशेष म्हणजे राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत केडियांनी त्यांना आव्हानच दिलं. ‘नोंद घ्या राज ठाकरे मी तीस वर्षांपासून मुंबईत राहतो तरी मला मराठी येत नाही. आता तुमचं याबाबत बेफाम गैरवर्तन पाहता मी पण प्रतिज्ञा करतो जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोला…’, असं केडियाने म्हटलंय
सुशील केडिया नेमके कोण
सुशील केडिया केडियानॉमिक्स या नावाची रिसर्च फर्म चालवतात. केडियानॉमिक्स या रिसर्च फर्मचे सुशील केडिया संस्थापक आहेत. ही संस्था संपत्ती नियोजन आर्थिक सल्ले आर्थिक विश्लेषणाच्या सेवा पुरवते. शेअर बाजारातील गुंतवणूकदार तज्ञ अशी केडिया यांची ओळख आहे. भारतीय शेअर बाजाराचा 20 वर्षांचा अनुभव असल्याचाही त्यांचा दावा आहे.
महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि आता तर मराठीला अभिजात भाषेचाही दर्जा केंद्र सरकारने दिला पण मुंबईत राहून भाषेचा सन्मान सुद्धा केडियासारखे व्यवसायिक करत नाही उलट ट्विट करून आपण तीस वर्ष राहून सुद्धा मराठी येत नाही काय करायचे बोल अशी मस्ती अंगात शिरली आहे.