विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल? शिंदे म्हणाले, ‘शोधावं लागेल…’
बाळासाहेबांनी आम्हाला विरोधाला विरोध न करता, चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती शिकवली आणि आम्ही तेच करतोय. मात्र विरोधकांकडून हे होताना दिसत नाही, अशी टीका केली आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. तर अजित पवार यांनी महाविकास आघाडीसह शरद पवार यांच्याशी फारकत घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीत देखील फूट पडली आहे. त्यामुळे आता विरोधकांकडे विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर अजित पवार हे आता सत्तेत सहभागी आहेत. याचदरम्यान सरकारकडून अधिवेशनाआधी चहापाण्याचे आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यावर बहिष्कार टाकला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार संयक्त पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार, फडणवीस आणि मी तिघेही विरोधी पक्षनेता होतो. त्यांमुळे आम्हाला सगळा अनुभव आहे. तर बाळासाहेबांनी आम्हाला विरोधाला विरोध न करता, चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती शिकवली आणि आम्ही तेच करतोय. मात्र विरोधकांकडून हे होताना दिसत नाही, अशी टीका केली आहे. पण सध्या विरोधी पक्ष कुठे आहे ते शोधावं लागेल असा टोला देखील शिंदे यांनी लगावला आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

