AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | महाराष्ट्रात विस्तार, बिहारमध्ये ‘भूकंप’

| Edited By: | Updated on: Aug 09, 2022 | 10:07 PM
Share

नितीश कुमारांनी 21 महिन्यातच पलटी मारली. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच आरजेडी आणि काँग्रेसोबत सत्ता स्थापन करणार आहेत विशेष म्हणजे, भाजपची साथ सोडून नितीश कुमारांनी सरकार पाडलं असलं..तरी नव्या सरकारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील. तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होणार असून त्यांच्याकडे गृहमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे.

मुंबई :  महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता. त्याचवेळी बिहारमध्ये राजकीय भूकंप(political controversy in Bihar) सुरु होता. नितीश कुमारांनी(Nitish Kumar) भाजपसोबतची आघाडी तोडली, आणि थेट मोदी-शाहांना जबर धक्का दिला. आधी राज्यपालांना भेटून नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला
त्यानंतर लालू प्रसाद यादवांचे पूत्र आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादवांच्यासोबत राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. 164 आमदारांचं समर्थन असल्याचं पत्र नितीश कुमारांनी राज्यपाल फागू चौहान यांना दिलं.

नितीश कुमारांनी 21 महिन्यातच पलटी मारली. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच आरजेडी आणि काँग्रेसोबत सत्ता स्थापन करणार आहेत विशेष म्हणजे, भाजपची साथ सोडून नितीश कुमारांनी सरकार पाडलं असलं..तरी नव्या सरकारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील. तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होणार असून त्यांच्याकडे गृहमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे.

नितीश कुमारांचा हा मुख्यमंत्री फॉर्म्युला बिहारमध्ये प्रसिद्ध आहे. 5 वेळा नितीश कुमार निवडणुकीत विजयी झालेत ते 8 व्यांदा मुख्यमंत्री होतील. पण कार्यकाळ संपण्याच्याआधीच नितीश कुमार राजीनामा देतात, आणि विरोधकांसोबतच सत्ता स्थापन करतात. 1994मध्ये लालू प्रसाद यादवांसोबत वेगळं होऊन पार्टी तयार केली. 2005 मध्ये भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री झाले. 2013 मध्ये मोदींचं नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित होताच भाजपसोबत आघाडी मोडली. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडीसोबत निवडणुका लढवल्या. 2015 मध्ये आरजेडीच्या अधिक जागा येऊनही लालू प्रसादांनी नितीन कुमारांना मुख्यमंत्री केलं. मात्र 2017 मध्ये पुन्हा आरजेडीची साथ सोडली आणि भाजपसोबत आघाडी केली. 2020 मध्ये भाजपसोबत निवडणुका लढवल्या, भाजपच्या जेडीयूपेक्षा अधिक जागा असतानाही नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री केलं. आता पुन्हा 2022 मध्ये भाजपसोबत आघाडी तोडली आणि आता आरजेडीसोबत सत्ता स्थापन करणार

पण आता जो डाव नितीश कुमारांनी टाकलाय, तो बिहार सारख्या राज्यात भाजपला 2024 मध्ये परवडणारा नाही. कारण बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत..आणि नितीश कुमारांची जेडीयू आणि लालू यादवांची आरजेडी जेव्हा एकत्र येतात भाजपला पराभव होतो, हा इतिहास आहे.  जेडीयूत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, नितीश कुमारांचा आहे..त्यामुळं महाराष्ट्राप्रमाणं शिंदे गट निर्माण होण्याआधीच नितीश कुमारांनी भाजपलाच धक्का दिलाय.

Published on: Aug 09, 2022 10:07 PM