VIDEO : Army Helicopter Crash| आर्मीचं चॉपर कोसळलं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून पंतप्रधानांना ब्रिफिंग

तामिळनाडू येथे आर्मीचे चॉपर कोसळले आहे. सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते.

तामिळनाडू येथे आर्मीचे चॉपर कोसळले आहे. सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरण खराब आहे. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. मृतांची संख्या 11 झाल्याची माहीती मिळते आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI