Bipin Rawat Funeral | आठवणींना उजाळा देताना मुलींचे डोळे पाणावले, बिपीन रावत यांची अंत्ययात्रा LIVE

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) बुधवारी  कोसळलं. या दुर्घटनेत देशाचे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.  बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 10, 2021 | 4:05 PM

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) बुधवारी  कोसळलं. या दुर्घटनेत देशाचे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.  बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात दुर्घटनाग्रस्त झाले. बिपीन रावत आणि इतर अधिकाऱ्यांचं पार्थिव गुरुवारी सांयकाळी दिल्लीला आणण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बड्या नेत्यांनी काल दुर्घटनेत शहीद झालेल्या अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली.

जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव काही वेळात दिल्ली कॉन्टेनमेंट मध्ये दाखल होणार आहे. बांगलादेश, फ्रान्ससह काही देशांच्या सैन्यदलातील अधिकारी अंत्यसंस्कारसाठी उपस्थित आहेत. राजधानी नवी दिल्ली मधील नागरिकांकडून रावत यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी सुरु आहे. घोषणांनी राजधानी मधील रस्ते दुमदुमले आहेत. श्रीलंका, नेपाळ देशांचे लष्करी अधिकारीही उपस्थित राहिले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें