Mumbai | बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी करा, BJP ची मागणी

बेस्ट उपक्रमाच्या कर्मचारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा याकरता यावर्षी  त्यांना मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सानुग्रह अनुदान देण्यात यावे,अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्ट समिती अध्यक्षांकडे ही मागणी करत याचा अहवाल समितीच्या पटलावर ठेवण्याचीही मागणी केली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या कर्मचारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा याकरता यावर्षी  त्यांना मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सानुग्रह अनुदान देण्यात यावे,अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्ट समिती अध्यक्षांकडे ही मागणी करत याचा अहवाल समितीच्या पटलावर ठेवण्याचीही मागणी केली आहे. महापालिकेनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा  निर्णय, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान देण्याची अद्यापही घोषणा झालेली नाही. महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा झाल्यांनतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे भाजपचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी समिती अध्यक्षांना ठरावाच्या सूचनेद्वारे विनंती करत महापालिकेच्या धर्तीवर बेस्ट कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI