रेल्वे अपघानंतरचा भायवह व्हिडीओ, ट्रॅकवर पडले 6 मृतदेह; रेल्वेच्या PRO नी सांगितलं अपघाताचं कारण…
'सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास लोकलमधील आठ ते नऊ प्रवासी रेल्वे रुळावर पडले. त्यानंतर 9.50 च्या सुमारास घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ते खाली पडले'
मुंबईतील मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ ते नऊ प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात अधिकृत माहिती दिली. या घटनेनंतर रेल्वे बोर्डाकडूनकाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसह येतील. त्याच्यामध्ये 238 एसी लोकल मुंबई उपनगरासाठी घेतले जाणार आहेत. या गाड्यांना ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट असेल. तिसरा निर्णय म्हणजे आयसीएफद्वारे आताच्या लोकल गाड्यांना रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

