धावती यात्रा, चैत्री एकादशीच्या निमित्ताने विठुरायाचा गाभारा सजला; लाखो भाविक दर्शनाला
एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिराला सनफ्लॉवर, गुलाब, अष्टर, शेवंती, झेंडू अशा देशी विदेशी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी ही केली आहे
पंढरपूर : चैत्री एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी आज लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिराला सनफ्लॉवर, गुलाब, अष्टर, शेवंती, झेंडू अशा देशी विदेशी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी ही केली आहे. त्यांनी यासाठी सुमारे एक टन फुलांचा वापर केला आहे. तर देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडप, चार खांबी अशा मंदिरातील विविध ठिकाणी ठिकाणी सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. फुलांची आरास केल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
Published on: Apr 02, 2023 10:08 AM
Latest Videos
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती

