Chandrakant Khaire On Rebel | पाचही बंडखोरांना आडवं करु, चंद्रकांत खैरै यांचा शिंदे गटातील आमदारांना थेट इशारा

Chandrakant Khaire On Rebel | बंडखोरीच्या दोन महिन्यानंतर आता औरंगाबादमध्ये खऱ्या अर्थाने बंडखोरांविरोधात शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे

कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 13, 2022 | 3:32 PM

Chandrakant Khaire On Rebel | बंडखोरीच्या दोन महिन्यानंतर आता औरंगाबादमध्ये (Aurangabad) खऱ्या अर्थाने बंडखोरांविरोधात (Against Rebel) शिवसेनेच्या नेत्यांनी (Shiv Sena Leader)जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पाच ही बंडखोर आमदारांना ललकारले आहे. या पाच ही बंडखोरांना आडवे करु असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे अनेक दिवसानंतर खैरै यांना फॉर्म गवसल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी संजय शिरसाट, संदिपान भूमरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. बंडखोरांना आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि खैरे हे दोघेच काफी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खैरै आणि दानवे यांच्यातील हाडवैर जगजाहीर आहे. पण हा कुटुंबातील सदस्यांचा तात्विक मतभेद आहे. या भांडणातून आमच्या दोघातील जिव्हाळा ही वाढल्याचे खैरे यांनी यावेळी सांगितले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें