भाजपचा 26 जूनला 1 हजार ठिकाणी चक्काजाम, दखल न घेतल्यास प्रखर आंदोलन करु, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

26 जूनला महाराष्ट्रात 1 हजार ठिकाणी 100 लोक याप्रमाणे 1 लाख लोक स्वत:ला अटक करुन घेणार आहोत. सरकार यानंतरही ऐकणार नसेल तर प्रखर आंदोलन करावं लागेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

26 जूनला महाराष्ट्रात 1 हजार ठिकाणी 100 लोक याप्रमाणे 1 लाख लोक स्वत:ला अटक करुन घेणार आहोत. सरकार यानंतरही ऐकणार नसेल तर प्रखर आंदोलन करावं लागेल. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर निवडणुका जाहीर करणं अन्यायकारक आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही उद्या राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन निवडणूक रद्द करण्याबाबत मागणी करणार आहोत. ओबीसी आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. परमबीर सिंगांनी आरोप केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय लागते. ओबीसी आरक्षणासाठी पुण्यात पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये आंदोलन करणार आहेत.