Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंनी युती करण्याचा विचार केला तर आमचे वरिष्ठ नेते विचार करतील

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jun 20, 2021 | 8:24 PM

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

प्रताप सरनाईक त्यांचे आमदार आहेत, नेते आहेत. त्यांचे नेते उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी विचार करावा. आमचे नेते केंद्रात आहेत. आम्ही त्यांना सांगू. बाकी आम्ही सुरुवातीलाच सांगत होतो की, बाळासाहेब ठाकरे यांची हयात ज्यांच्याविरोधात लढण्यात गेली, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी सरनाईक यांच्या पत्रावर दिली आहे.

(Chandrakant Patil says If Uddhav Thackeray thinks of forming an alliance, our senior leaders will think)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें