‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पवारांनी काय केलं?’ : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

भाजपला समाजात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, पण भाजप कधीही त्यांच्या डावात सापडली नाही. भाजप समाजातील सर्व स्तरांमध्ये वाढतेय. आता मराठा समाजाला कळून चुकलं की पवारसाहेब म्हणजे काय. आता ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवार साहेब काय आहेत. सगळ्यांना कळून चुकणार. असा आव आणायचा की मीच तारणहार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं?

‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पवारांनी काय केलं?’ : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
| Updated on: May 05, 2022 | 7:20 PM

कोल्हापूर : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यातच बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला दणका दिलाय. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम 15 दिवसांत जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यानंतर भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली जातेय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केलीय. यावळी त्यांनी आता मराठा समाजाला कळून चुकलं की पवारसाहेब म्हणजे काय. आता ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवार साहेब काय आहेत. सगळ्यांना कळून चुकणार. असा आव आणायचा की मीच तारणहार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं? एवढ्या तुमच्या संस्था आहेत, त्यात एक निर्णय करुन टाका ना की मराठा समाजाला इतके इतके टक्के देणार. काही त्याचं ऑन पेपरही आणावं लागत नाही. कोर्टातही कुणी जाणार नाही. पण नाही… इच्छाच नाही. आपण मोठं व्हायचं आणि बाकी सगळे आपल्या गाडीमागे फिरणारे निर्माण करायचे, अशीच निती राहिली आणि ही निती आता उघड होत चालली आहे. भाजपचं नाव घेतल्यानं काही फरक पडत नाही. समाजाला माहिती आहे की कुणाची काय भूमिका होती.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.