मोठी बातमी, चंद्रकांत पाटील उद्या राज ठाकरेंची भेट घेणार, राज्याचं राजकारण नवं वळण घेणार?
गेल्या काही दिवसांत मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट होत आहे।
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीला शह देण्यासाठी राज्यात भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का? असा सवाल विचारला जात आहे. तसे संकेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांत मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.
Published on: Aug 05, 2021 07:20 PM
Latest Videos
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती

