Sudhakar Badgujar : …त्यांना दरवाजे उघडे, सुधाकर बडगुजरांची पक्षातून हकालपट्टी अन् बावनकुळेंची थेट खुली ऑफर काय?
पक्षविरोधी कारवाई केल्यानं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली. इतकंच नाहीतर सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते आणि संजय राऊत यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर सुधाकर बडगुजर यांनी पक्षाच्या व्यासपीठावर नाराजी व्यक्त केली नाहीतर पक्षात एखादा व्यक्ती असला काय आणि नसला काय फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली. तर दुसरीकडे भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सुधाकर बडगुजर यांच्यावर प्रतिक्रिया दिली. ज्याला भाजपता यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तर आरोप सिद्ध होईपर्यंत एखाद्याला गुन्हेगार ठरवू शकत नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 05, 2025 07:30 PM
Latest Videos

मंत्रिमंडळात लिंबू, मिरच्या, कवट्यांना महत्त्व, सामनातून शिंदेंवर टीका

याआधी 21 तारखेला आम्ही मॅरेथॉन योगा केलेला..., शिंदेंचा ठाकरेंना टोला

संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी गर्दी

ठाकरेंच्या 'किल मी'वर अमृता फडणवीस म्हणाल्या, कुणी मारेल असा विचार...
