Laxman Hake : अर्थखात्यातलं काय समजतं? काय माहितीये रे तुमच्या अजितदादाला? हाकेंची पुन्हा जिव्हारी लागणारी टीका
लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांची माफी मागितली नाहीतर त्यांना निपटवून टाकू, असा इशाराच प्रशांत पवार यांनी दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
अजित पवार यांना अर्थखात्यातलं काय समजतं? असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. असा सवाल करत लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीकास्त्र डागलंय. ‘अजित पवार यांचे दारूचे कारखाने आहेत त्याचं काय? दारू पिला दारू पिला असं म्हणत मला ट्रोल करताय. एआयद्वारे व्हिडीओ टाकताय मी काय प्रश्न विचारले त्याची उत्तर द्याना’, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी हल्लाबोल केलाय.
पुढे ते असेही म्हणाले, अर्थ खात्याचे अर्थमंत्री, अजित पवार यांना अर्थखात्यातलं काय समजतं? अजित पवार हे काय सीए आहेत काय? काय माहितीये रे तुमच्या अजितदादाला? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी करत अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. अजित पवार यांना समाजाची, लोक कल्याणाची, महाराष्ट्राच्या दायित्वाची जरा तरी जाण असती ना.. तर अजित पवार यांनी गावगाड्यातील शोषितांच्या वंचितांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं नसतं, असं हाके म्हणाले.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

