‘मोदी यांचा संकल्प शरद पवार यांना कळेल, त्यांचं मन परिवर्तन होईल’; भाजप नेत्याचा दावा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापूरमध्ये उद्या सभा होणार आहे. त्याची तयारी झाली असून दसरा चौकात मोठं मोठं बॅनर लागले आहेत. त्याचदरम्यान भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं त्यांचं मन परिवर्तन होईल असा दावा केला आहे
नागपूर : 24 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीने शरद पवार हे बाहेर पडले आहेत. ते राज्याचा दौरा करत असून त्यांची उद्या (२५ ऑगस्ट) रोजी कोल्हापुरमधील दसरा चौक येथे जाहीर सभा होणार आहे. तर त्यांनी याच्याआधी पुरोगामी विचार महाराष्ट्रासमोर मांडू असे म्हटलं आहे. त्यावरून भाजप नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक दावा केला आहे. ते विदर्भ दौऱ्यावर असताना नागपूरमध्ये बोलत होते.
यावेळी बावनकुळे यांनी, मला अजूनही वाटतं शरद पवार यांचं मन परिवर्तन होईल. जसे मोदींच्या नेतृत्वातील इस्रोच्या टीमने चंद्रयान-३ यशस्वी केलं. त्याचप्रमाणे मोदीजींचा संकल्प एक ना एक दिवस पवारांना पटेल आणि ते आपलं मन परिवर्तन करतील.
काळ काही गोष्टींचा निर्णय करत असतो आम्हाला कधी एकनाथ शिंदे अजित पवार आमच्या सोबत असतील असं वाटलं नव्हतं. काही काळानंतर माणसाचं मनो परिवर्तन होत असतं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

