Chandrashekhar Bawankule |’एकमेकांवर टीका नको ठरलेलं, टीका करायला नको होती’
अजित पवारांची भूमिका ही समन्वय समितीच्या विरोधात होती. दादांनी असं बोलायला नको होतं बावनकुळे म्हणाले. महायुतीत काही फरक पडणार नाही, पण दादांनी टीका टाळली पाहिजे.
महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारमधील तिन्ही युतींमध्ये काही फरक पडणार नाही, पण अजित पवारांसारख्या व्यक्तिमत्वाने टीका, टिप्पणी करणं बंद करावं असं वक्तव्य महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये किमान तिन्ही नेत्यांनी आणि आम्ही समन्वय समितीचे नेते आहोत यांनी कुठल्याही मित्रपक्षाच्या नेत्यावर टीका करायची नाही, पण ज्या पद्धतीने अजित दादा बोलले ते आमच्या चर्चेला धरून नाही. त्यांनी असं बोलायला नको होतं. दादांना सल्ला देण्या इतका मी मोठा नाही परंतु, अजित पवारांची भूमिका ही समन्वय समितीच्या विरोधात होती. दादांनी असं बोलायला नको होतं बावनकुळे म्हणाले. महायुतीत काही फरक पडणार नाही, पण दादांनी टीका टाळली पाहिजे.
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..

