बालगृहात स्वयंरोजगाराच्या दृष्टीने चरखा ओळख आणि सूत कताईचे प्रशिक्षण

महात्मा गांधी व विनोबा भावे (Mahatma Gandhi, Vinoba Bhave) यांच्या विचारांवर आधारित चरखा चालविण्याचे कौशल्य विकसित करणे हा संस्थेचा हेतू आहे. मुलांनी प्रत्यक्ष सुत कताईचा आनंद घेतल्याची माहिती सुध्दा संस्थांनी सांगितली आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 20, 2022 | 12:00 PM

वर्धा (Wardha) जिल्हा महिला व बाल विकास (Women & Child Welfare Department) अधिकारी कार्यालयाच्यावतीने ग्राम विकास संस्था, गोपुरी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील बाल व निरिक्षणगृहातील 12 वर्षाच्या वरील 64 बालकांना चरखा ओळख व सुत कताईचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा नुकताच शुभारंभ सोहळा झाला. त्यावेळी अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच अनेक मान्यवरांनी बालगृहातील मुलांना मागदर्शन देखील केले. महात्मा गांधी व विनोबा भावे (Mahatma Gandhi, Vinoba Bhave) यांच्या विचारांवर आधारित चरखा चालविण्याचे कौशल्य विकसित करणे हा संस्थेचा हेतू आहे. मुलांनी प्रत्यक्ष सुत कताईचा आनंद घेतल्याची माहिती सुध्दा संस्थांनी सांगितली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें