AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chenab Bridge : जगातील सर्वात उंच चिनाब पूल! पाहा एक झलक

Chenab Bridge : जगातील सर्वात उंच चिनाब पूल! पाहा एक झलक

| Updated on: Jun 06, 2025 | 6:35 PM

चिनाब रेल्वे पूल बांधण्यासाठी दोन दशके लागली आहेत, परंतु त्याचे उद्घाटन झाल्यानंतर, काश्मीर खोरे आणि जम्मू दरम्यान थेट रेल्वे कनेक्टीव्हीटी सुरू होणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर खोरे असा थेट प्रवास आता करणं शक्य होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी २७२ किमी लांबीच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. साधारण १३१५ मीटर लांबीचा हा पूल संपूर्ण प्रकल्पातील सर्वात कठीण आणि वेळखाऊ भाग होता. या पुलाच्या उद्धाटनानंतर जम्मू काश्मीरच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आणि १३० वर्षे जुने स्वप्न साकार झाले.

२००३ मध्ये चिनाब पुलाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. २००५ मध्ये पुलाचे बांधकाम सुरू झाले. २००९ मध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण करायचे होते, परंतु ते झाले नाही. तर २०१७ साली ३२०० कामगार आणि अभियंते यासाठी कामाला लागले. काम थांबू नये म्हणून, ५२ निवासी ब्लॉकमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. २०२१ मध्ये पुलाच्या कमानी बांधण्याचे काम सुरू झाले. पुलावर ट्रॅक टाकण्याचे कामही सुरू झाले. २०२४ ला गाड्यांची चाचणी पूर्ण झाली. चाचणी आणि तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली. २०२५ ला मंजुरीच्या २२ वर्षांनंतर ६ जून रोजी पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

Published on: Jun 06, 2025 06:35 PM