Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal Video : सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? थेट फोटो दाखवत भुजबळांचे गंभीर आरोप

Chhagan Bhujbal Video : सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? थेट फोटो दाखवत भुजबळांचे गंभीर आरोप

| Updated on: Mar 05, 2025 | 6:05 PM

तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला अन् राज्यात पुन्हा उद्रेक झाला. या घटनेनंतर अधिवेशन सुरू असताना सभागृहात छगन भुजबळांनी असे कृत्य करणाऱ्या हैवानावर चांगलीच भडास काढली.

जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला चटके देऊन मानवी कौर्याचां आणखी एक व्हिडीओ समोर आला. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला अन् राज्यात पुन्हा उद्रेक झाला. या घटनेनंतर अधिवेशन सुरू असताना सभागृहात छगन भुजबळांनी असे कृत्य करणाऱ्या हैवानावर चांगलीच भडास काढली. धनगर समाजाच्या तरूणांला अक्षरशः निर्घृणपणे तप्त लोखंडी सळईचे चटके देण्यात आले. धनगराचा माणूस आहे आपण बोलायचं नाही… कोण करणार याचा निषेध? महाराष्ट्र चाललाय कुठे? असे एक न् अनेक फोटो दाखवत छगन भुजबळ सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘औरंगजेबीपणा महाराष्ट्रात परत कसा काय आला? हा माणूस एकच नाहीतर अनेक लोकं असतील. त्याला पकडणारे, त्याला चटके देणारे किती लोकं असतील ते सगळे बघत बसले? असा आक्रमक सवाल करत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’, असं छगन भुजबळ म्हणाले. पुढे त्यांनी असेही सांगितले, घडलेल्या प्रकारानंतर केवळ सरकार, पोलीस यंत्रणा आणि जिल्ह्याचे एसपी यांना दोष देऊन चालणार नाही. महाराष्ट्रातील आपली संस्कृती अशी नाही. ही संताची भूमी आहे. राज्याचा विकास व्हायला हवा. पण ज्या माणसासाठी विकास करायचा तो माणूस जनावरासारखं मारला जात असेल तर विकास कोणासाठी झाला पाहिजे? असा सवालही भुजबळांनी सभागृहात उपस्थित केला.

Published on: Mar 05, 2025 06:05 PM