Special Report | हनुमान जन्मस्थळ वादाला छगन भुजबळांचं ‘बळ’
मंत्री छगन भुजबळांनी महंतांची नक्कल केल्याचे समोर आले आहे. तर पत्रकार परिषदेत बूम उगारला. तसेच त्यांनी त्यावर वक्तव्यही केलं. तर पत्रकार परिषदेत नाशिकचे पालकमंत्री भुजबळ यांनी समोरील बूम उगारून तुम्हाला त्याबद्दल काही शंका आहे असे विचारणा केली
Special Report : राज्यात आधी हनुमान चलिसेवरून जोरदार रणकंदण माजल्यानंतर आता हनुमानाच्या (Hanuman) जन्मस्थळावरुन वाद सुरू झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या शास्त्रार्थ सभेत (Shastrartha Sabha) मारुतीराया बाजुलाच राहिला आणि साधु-महंत आपसांत भिडले. नाशिकमधील एका महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य (Shankaracharya) यांना उल्लेख काँग्रेसी असा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली. तत्पूर्वी आसनव्यवस्थेवरुनही हे साधू-महंत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं. जगद्गुरुंचा अपमान केल्याप्रकरणी महंत सुधीरदास यांनी माफी मागावी अशी आक्रमक मागणी करण्यात आलीय. त्यानंतर शास्त्रार्थ सभेत मोठा राडा पाहायला मिळाला. मात्र आज यावरून मंत्री छगन भुजबळांनी महंतांची नक्कल केल्याचे समोर आले आहे. तर पत्रकार परिषदेत बूम उगारला. तसेच त्यांनी त्यावर वक्तव्यही केलं. तर पत्रकार परिषदेत नाशिकचे पालकमंत्री भुजबळ यांनी समोरील बूम उगारून तुम्हाला त्याबद्दल काही शंका आहे असे विचारणा केली.
Published on: Jun 01, 2022 09:39 PM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
