छगन भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ पुस्तकातील 'ते' दावे फेटाळले अन् दिला इशारा, 'विधानसभेनंतर...'

छगन भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ पुस्तकातील ‘ते’ दावे फेटाळले अन् दिला इशारा, ‘विधानसभेनंतर…’

| Updated on: Nov 08, 2024 | 2:42 PM

‘२०२४: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात नमूद करण्यात आल्यानुसार ईडीपासून सुटका व्हावी यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात हा दावा करण्यात आला असून भुजबळांनी हे दावे फेटाळले आहेत.

भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली. ईडीपासून सुटका झाली त्यामुळे भाजपसोबत केल्याचा सर्वांना आनंद आहे, मंत्री छगन भुजबळ यांनी The Election That Surprised India पुस्तकात हा मोठा दावा केल्याचा उल्लेख आहे. मात्र हे सर्व दावे भुजबळ यांनी फेटाळत विधानसभा निवडणुकीनंतर कायदेशीर कारवाई कऱण्याचा इशाराही दिलाय. छगन भुजबळ म्हणाले,  ‘लोकसत्ते’बरोबर अशी कोणतीही मुलाखत मी दिली नाही. ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही सर्व भाजपसोबत गेले हा आरोप अनेक दिवसांपासून आमच्यावर होत आहे. तिसरे म्हणजे कोर्टाने महाराष्ट्र सदन प्रकरणात ‘क्लिन चीट’ दिली आहे. ही ‘क्लिन चीट’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार होतं तेव्हा दिली होती. त्यावेळी मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पेढेही दिले होते. पुढे भुजबळ असेही म्हणाले, मला तुरुंगात जाण्याची भीती आहे, असा आरोप जो केला जात आहे, तो मी नाकारत आहे. मी विकासासाठी एकत्र आलो. आमच्याबरोबर ५४ लोक आहेत. त्यांच्यावर प्रत्येकावर ईडीची केस नव्हती. मात्र महायुतीत आल्यानंतर माझ्या मतदार संघात दोन हजार कोटींची कामे सुरु आहे. सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो, त्याचा विकासासाठी फायदा झाला असल्याचे म्हणत पुस्तकातील सर्व दावे भुजबळांनी फेटाळून लावले आहेत.

Published on: Nov 08, 2024 02:42 PM