गोपीनाथ मुंडे आज असते तर ओबीसींचे प्रश्न मार्गी लागले असते : छगन भुजबळ

अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलंय. परळीत दाखल झाल्यानंतर भुजबळांनी गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.

अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलंय. परळीत दाखल झाल्यानंतर भुजबळांनी गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. दरम्यान मुंडेंच्या आठवणींना छगन भुजबळ यांनी उजाळा दिला आहे. पक्ष वेगवेगळे असले तरी ओबीसी आणि मागासवर्गीयच्या प्रश्नावर एकत्र होतो, लोकसभेत प्रश्न मांडताना भाजप काय म्हणेल याचा कधीच विचार केला नाही. मुंडे आज असते तर नक्कीच हे प्रश्न मार्गी लावले असते असे देखील यावेळी भुजबळ म्हणाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI