Chhagan Bhujbal | महाराष्ट्रातील उद्योग कुठेही जाणार नाही – छगन भुजबळ

आशिष शेलारांना महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी उत्तर दिलं आहे, महाराष्ट्रातले उद्योग कुठेही जाणार नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं आहे

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे आणि ममतादीदींच्या भेटीची अधिकृत माहिती राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे. हे एक कटकारस्‍थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्‍ये घेऊन जाण्‍यास सत्‍ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलारांना महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी उत्तर दिलं आहे, महाराष्ट्रातले उद्योग कुठेही जाणार नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं आहे

Published On - 9:30 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI