AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परदेशात राहून राजकारण कसं होईल?; ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. एखादा व्यक्ती काहीच करत नसेल आणि तो फक्त परदेशातच राहत असेल तर राजकारण कसं करता येईल? अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

परदेशात राहून राजकारण कसं होईल?; ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला
Mamata Banerjee
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 6:41 PM
Share

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. एखादा व्यक्ती काहीच करत नसेल आणि तो फक्त परदेशातच राहत असेल तर राजकारण कसं करता येईल? अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. तुम्ही फिल्डवर राहिला नाही तर काँग्रेस तुम्हाला बोल्ड करेल. तुम्ही फिल्डवर राहिला तर भाजपचा पराभव होईल, असं ममता दीदी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. यावेळी त्यांनी मीडियाशीही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना कानपिचक्या दिल्या. तुम्ही काँग्रेसविरोधात का लढत आहात? असा सवाल त्यांना करण्यात आला. काँग्रेस आणि डावे पक्ष बंगालमध्ये आमच्याविरोधात लढू शकतात तर आम्हीही त्यांच्याविरोधात जाऊ शकतो. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्हाला ही लढाई लढावीच लागेल, असं त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रात येणार नाही

पश्चिम बंगाल हे अत्यंत शांततावादी राज्या आहे. मात्र, इथे रोज एक व्हिडिओ सर्कुलेट केला जातो. राज्याची प्रतिमा मलिन केली जाते. मीही तळागाळातून आले आहे. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत आम्ही लढतच राहू, असंही त्यांनी सांगितलं. आम्ही महाराष्ट्रात आमचा पक्ष क्रियाशील करणार नाही. ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष चांगलं काम करत आहे तिथे आम्ही जाणार नाही. उलट आम्ही या मित्र पक्षांना पाठबळ देण्याचं काम करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही आल्याने स्पर्धा वाढेल

आमच्या बंगालमध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे. पण आम्हाला तरीही बंगालच्या बाहेर पडावे लागेल. आम्ही बाहेर पडल्याने स्पर्धाही वाढेल, असं सांगत ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याचे संकेतच दिल्याचं सांगितलं जात आहे.

जाता जाता भाजप सर्व काही विकेल

आपण काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन मिळावं म्हणून तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली पाहिजे, असं आमचं मत होतं. पण काँग्रेसने आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. संपूर्ण देशात एक सिव्हील सोसायटी असावी असं आमचं मत आहे. जर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावेच लागेल, असं सांगतानाच हा पक्ष जाता जाता सर्व काही विकून जाईल, असा चिमटा त्यांनी भाजपला लगावला.

संबंधित बातम्या:

राज्य सरकाचा मोठा निर्णय, आंतरराज्यीय विमानप्रवासासाठी RTPCR चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक

VIDEO: ममता बॅनर्जी पवारांसमोरच म्हणाल्या, यूपीए आहे कुठे?; ममतादीदींनी काँग्रेस नेतृत्व नाकारलं?

Twitter CEO: ट्विटरचा नवा सीईओ मुळ भारतीय आहे, मग पाकिस्तानची एवढी का खिल्ली उडवली जातेय? वाचा कारणं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.