Twitter CEO: ट्विटरचा नवा सीईओ मुळ भारतीय आहे, मग पाकिस्तानची एवढी का खिल्ली उडवली जातेय? वाचा कारणं

काहींनी एका बाजुला भारतीय सीईओंचे फोटे आणि दुसऱ्या बाजुला पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांचे फोटो असे पोस्ट शेअर केले. येथे दोन्ही देशांच्या विकासाची तुलना केली जात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा विकास आणि दहशतवादाच्या क्षेत्रात पाकिस्तानचा विकास. अशा विविध प्रकारे पाकिस्तानला ट्रोल केले जाते.

Twitter CEO: ट्विटरचा नवा सीईओ मुळ भारतीय आहे, मग पाकिस्तानची एवढी का खिल्ली उडवली जातेय? वाचा कारणं
Parag Agrawal Twitter CEO

नवी दिल्लीः भारतीय वंशाचे पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ (Parag Agrawal Twitter CEO) बनल्यानंतर, ट्विटरवर अनेक लोक पाकिस्तानला ट्रोल (Pakistan trolled) करत आहेत. पण ट्विटरचा नवा सीईओ भारतीय असताना पाकिस्तानला मध्ये का ओढले जात आहे? कारण जगभरातील नेटिझन्स- काही स्वतः पाकिस्तानी लोकांसह, भारतीयांची आणि पाकिस्तानी लोकांची आपापल्या क्षेत्रातील कामगिरीची तुलना करत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय जगात अव्वल (Information Technology) आहेत, हे जगाला माहीत आहे. त्याच वेळी, जगभरात दहशतवाद (Terrorism) पसरवण्याचा आरोपावर अनेक पाकिस्तानी संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानची खिल्ली उडवायला काल सुरूवात झाली जेव्हा उमर सैफ नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीने स्ट्राइपचे सीईओ पॅट्रिक यांनी एक ट्विट शेअर केलं आणि लिहलं, ‘प्रिय पाकिस्तान स्पर्धा करण्यासाठी ही चांगली गोष्ट असू शकते’.

दोन्ही देशांच्या विकासाची तुलना

पॅट्रिक कोलिसन यांनी लिहिले होते की, ‘गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडोब, आयबीएम, पालो, अल्टो नेटवर्क्सनंतर ट्विटरचेही सीईओ भारतात मोठे झालेले आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात हे भारतीयांचे मोठे यश आहे.’ उमर सैफनो पुढे ट्विट केलं की ‘आता मार्क झुकेरबर्ग (फेसबुक सीईओ) च्या जागी भारतीय सीईओ केव्हा होणार यावर पैज लावत आहे…..’

यानंतर काहींनी एका बाजुला भारतीय सीईओंचे फोटे आणि दुसऱ्या बाजुला पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांचे फोटो असे पोस्ट शेअर केले. येथे दोन्ही देशांच्या विकासाची तुलना केली जात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा विकास आणि दहशतवादाच्या क्षेत्रात पाकिस्तानचा विकास. अशा विविध प्रकारे पाकिस्तानला ट्रोल केले जाते.

तर काहींनी ट्विट केले की पाकिस्तानचा विकास न होण्यासाठी लोक इस्लामला दोष का देतात? धार्मिक कारणामुळे नाही तर एक देश म्हणून पाकिस्तानचा विकास झालेला नाही. बर्‍याच लोकांनी असेही म्हटले आहे की भारतीयांकडे आयआयटी सारखी सर्वोच्च संस्था आहे जी तंत्रज्ञानामध्ये बुद्धिमान लोकांना तयार करते. पण पाकिस्तानात अशी कोणतीही संस्था नाही. काहींनी सांगितले की, पाकिस्तानी देखील तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत आहेत, परंतु भारतीयांकडे सर्व पार्श्वभूमीतील लोकांसाठी उत्तम व्यवस्थापकीय कौशल्ये आहेत. हे भारताच्या विविध संस्कृतीमुळे आहे.

एकंदरीत, पराग अग्रवाल हे ट्विटरचे सीईओ बनल्यानंतर जगभरातून भारताचे अभिनंदन होत आहे. गुगल नंतर जगात ट्विटरचा खूप वापर केला जातो. अशा प्रकारे, भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ट्विटरचा प्रमुख हा एक भारतीय वंशाचा आहे.

इतर बातम्या

Sharad Pawar : काँग्रेसला वगळून तिसरा पर्याय निर्माण होणार का? शरद पवारांनी सांगितली नेमकी रणनिती

Parliament session:खासदारांच्या निलंबनावरून संसदेबाहेर जोरदार आंदोलन, जया बच्चन यांनी चॉकलेट आणि पापड वाटले


Published On - 5:24 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI