AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : काँग्रेसला वगळून तिसरा पर्याय निर्माण होणार का? शरद पवारांनी सांगितली नेमकी रणनिती

बैठकीत राष्ट्रीय राजकारण (National Politics) आणि भाजप विरोधातील आगामी रणनिती याबाबत चर्चा झाल्याची माहिती खुद्द ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच प्रादेशिक पक्षांना एकत्र करत देशात भाजपविरोधात तिसरा पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही यावेळी स्पष्ट दिसून आलं. त्यावेळी पत्रकारांनी काँग्रेसबाबत विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी अत्यंत महत्वपूर्ण आणि सूचक असं उत्तर दिलं.

Sharad Pawar : काँग्रेसला वगळून तिसरा पर्याय निर्माण होणार का? शरद पवारांनी सांगितली नेमकी रणनिती
शरद पवार, ममता बॅनर्जी (फाईल फोटो)
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 4:39 PM
Share

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुंबई दौऱ्यातील आपल्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय राजकारण (National Politics) आणि भाजप विरोधातील आगामी रणनिती याबाबत चर्चा झाल्याची माहिती खुद्द ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच प्रादेशिक पक्षांना एकत्र करत देशात भाजपविरोधात तिसरा पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही यावेळी स्पष्ट दिसून आलं. त्यावेळी पत्रकारांनी काँग्रेसबाबत विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी अत्यंत महत्वपूर्ण आणि सूचक असं उत्तर दिलं.

देशात काँग्रेसला वगळून भाजपविरोधात तिसरा पर्याय निर्माण केला जाणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी अत्यंत सावधगिरीने उत्तर दिलं. ‘कुणाला वगळ्याची बात नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायची बात आहे. त्यामुळे जो मेहनत करतोय आणि सगळ्यांसोबत येण्यासाठी तयार आहे, त्या सगळ्यांच्या सह’, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

‘नेतृत्वाचा विषय नाही, एक सक्षम पर्याय द्यायचा आहे’

शरद पवार सर्वात सिनियर नेते आहेत, आता शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं काय? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आला. त्यावेळी अरे काय यूपीए, आता कोणतीही यूपीए नाही. आम्ही सर्व बसून ठरवू, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना मध्ये तोडत, शरद पवार म्हणाले की, इथे नेतृत्वाचा विषय नाही. एक स्ट्राँग अल्टरनेटिव्ह, ज्यांच्यावर या देशातील जनतेचा विश्वास असेल. भाजपला दूर करण्यासाठी मदतगार होईल, त्या रस्त्याने आम्ही जाऊ, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

‘राष्ट्रीय पातळीवर सर्वांनी एकत्र येण्याबाबत चर्चा’

वेस्ट बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं असोसिएशन आहे. काल त्यांनी राऊत आणि आदित्यची भेट घेतली. आज त्यांनी माझी भेट घेतली. राष्ट्रीय पातळीवर जी काही राजकीय परिस्थिती आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी त्या आल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवर सर्वांनी एकत्र यावं आणि देशात पर्याय देण्यावर या बैठकीत चर्चा केल्याचं पवार यांनी सांगितलं. जे लोक भाजपच्या विरोधात आहेत, त्या सर्वांनी एकत्र यावे, असं आवाहनही पवारांनी यावेळी केलं आहे.

इतर बातम्या :

Omicron Variant : आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावरील बंदी कायम, ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे केंद्राचा मोठा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के वेतनवाढीचे परिपत्रक काढले; 10 वर्षे सेवा झालेल्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.