AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकाचा मोठा निर्णय, आंतरराज्यीय विमानप्रवासासाठी RTPCR चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक

महाराष्ट्र सरकारने तर आंतरराज्यीय विमान उड्डाणांविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. विमानतळावर डोमॅस्टिक पॅसेंजरकरीता 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्य सरकाचा मोठा निर्णय, आंतरराज्यीय विमानप्रवासासाठी RTPCR चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 5:15 PM
Share

मुंबई : कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉन (Omicron) विषाणूमुळे जगाची झोप उडालीय. संसर्गदर जास्त असल्यामुळे वेगवेगवेगळ्या देशातील वैज्ञानिक आणि आरोग्य विभाग या विषाणूचा अभ्यास करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशात खबरदारी म्हणून अनेक प्रतिबंधात्मक नियम लागू केले जातायत. महाराष्ट्र सरकारने तर आंतरराज्यीय विमान उड्डाणांविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. विमानतळावर डोमॅस्टिक पॅसेंजरकरीता (Domestic passengers) 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीचा अहवाल निगेटिव्ह दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याआधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले बंधनकारक 

यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक होते. मात्र आता मुंबई विमानतळावर 72 तासांपर्यंतचा कोरोना चाचणी अहवालल निगेटिव्ह असल्याचे दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

7 दिवस संस्थात्मक विलगीकरण, 14 दिवस होम आयसोलेशन सक्तीचे

विशेष म्हणजे प्रवाशांकडे आरटीपीसीआरचा अहवाल नसल्यास विमानतळावरच कोरोना चाचणी केली जाणार आहे. यापूर्वीच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार साऊथ अफ्रिका, रिस्क कंट्रीज मधून येणाऱ्या प्रवाशांचे 7 दिवस संस्थात्मक विलगीकरण आणि त्यानंतर 14 दिवस होम आयसोलेशन करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे.

आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरील बंदी कायम

तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणंबद्दलही मोठा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणवरील बंदी कायम ठेवली आहे. येत्या 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे सुरू होणार होती. मात्र सध्या ओमिक्रॉन विषाणूमुळे सरकारने 15 डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावरील बंदी कायम ठेवली आहे.

कोविड सेंटरर्स सज्ज, आवश्यक ते सर्व करा

दरम्यान, सध्यातरी देश तसेच राज्यात ओमिक्रॉन या कोरोना विषाणूचा संसर्ग असलेला रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून राज्य सरकारने आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील जंबो कोविड सेंटर्स पुन्हा एकदा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे प्रादुर्भावर रोखण्यासाठी अवश्यक वाटेल ते सर्वकाही करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत.

इतर बातम्या :

ममतांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? पवारांनी जे सांगितलं त्यानं काँग्रेसची चिंता वाढणार?

एसटी कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के वेतनवाढीचे परिपत्रक काढले; 10 वर्षे सेवा झालेल्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार

मुंबईत भांडी विकणाऱ्या महिलेची दहशत, फिल्मी स्टाईलने गुंगीचे औषध लावून तीन महिन्याच्या बाळाची चोरी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.