ममतांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? पवारांनी जे सांगितलं त्यानं काँग्रेसची चिंता वाढणार?

देशाच्या राजकारणात एक मोठे वळण घेणारी महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. पश्चिम बंगालमध्ये भाजपला थोपवत मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते शरद पवार यांच्या दरम्यान महत्त्वाची बैठक पार पडली.

ममतांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? पवारांनी जे सांगितलं त्यानं काँग्रेसची चिंता वाढणार?
ममता बॅनर्जी- शरद पवार भेट

मुंबईः देशाच्या राजकारणाला मोठे वळण देण्याची ताकद असलेली महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी देशाचे भावी नेतृत्व कोण करेल, कोण-कोणत्या पक्षांची एकी होईल, याविषयी काही संकेत दिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची ठरतील.

ममतांसोबतच्या भेटीत काय झालं, काय म्हणाले पवार? 

शरद पवार म्हणाले, ” सध्याच्या काळात एकत्रित नेतृत्व करण्याची गरज आहे. मजबूत 2024 च्या निवडणुकीकरता सत्ताधारी पक्षाविरोधात एक मजबूत नेतृत्व उभारण्याची गरज आहे. याच हेतूस्तव ममता बॅनर्जी यांनी हा दौरा केला. या बैठकीत त्यांनी अत्यंत सकारात्मक चर्चा केली.

काँग्रेसबद्दल काय म्हणाले शरद पवार?

ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या या बैठकीत 2024 मधील लोकसभा निवडणुकीची रणनिती आखली गेली. मात्र काँग्रेसचा यावर काय परिणाम होईल, तुमच्या अलायन्समध्ये काँग्रेसला वगळणार का,  या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवार म्हणाले, काँग्रेसला वगळण्याची चर्चाच नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची बात आहे. त्यासाठी जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.

‘सिल्वर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली. सिल्व्हर ओक बंगल्यावर एक तास ही बैठक चालली. महाराष्ट्रात ममता बॅनर्जी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी भेट घेतली. मात्र काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी संवाद साधला नाही.

कालपासून ममता मुंबईदौऱ्यावर

मंगळवारपासून ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा सुरु आहे. काल संध्याकाळी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट दिली. तसेच संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली. पश्चिमबंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा हा पहिलाच दौरा आहे. भाजपने मात्र ममतांच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

इतर बातम्या-

पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध मोदी ? कुंटे प्रकरणावरुन मतभेद उघड, वाढत्या वादांनी महाराष्ट्राची कोंडी?


Published On - 4:33 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI