पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध मोदी ? कुंटे प्रकरणावरुन मतभेद उघड, वाढत्या वादांनी महाराष्ट्राची कोंडी?

केंद्र सरकारने तो अमान्य केलाय. कुंटे यांना मुदतवाढ देण्याची विनंती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, मोदी यांनी ठाकरे यांची विनंती अमान्य करत कुंटे यांना मुदतवाढ देण्यास नकार दिलाय.

पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध मोदी ? कुंटे प्रकरणावरुन मतभेद उघड, वाढत्या वादांनी महाराष्ट्राची कोंडी?
उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 3:12 PM

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरु असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतो. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारने तो अमान्य केलाय. कुंटे यांना मुदतवाढ देण्याची विनंती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, मोदी यांनी ठाकरे यांची विनंती अमान्य करत कुंटे यांना मुदतवाढ देण्यास नकार दिलाय.

कुंटे यांना मुदतवाढ न देण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे महाविकास विकास आघाडी सरकारविरोधी धोरण स्पष्ट झाल्याचं म्हटलं जातंय. अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदलीतील भ्रष्टाचार प्रकरणी कुंटे यांनी घेतलेली भूमिका लक्षात घेता पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य केली नसल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. तीन दिवसांपूर्वी ठाकरे यांनी रुग्णालयातूनच पंतप्रधान मोदींशी संवाद साधत कुंटे यांना मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. खुद्द ठाकरे यांनीच विनंती केल्यानं कुंटे यांना नक्की मुदतवाढ मिळेल असा दावा केला जात होता. मात्र, मोदींनी ही विनंती ठाकरेंनी अमान्य केली. त्यामुळे सीताराम कुंटे काल राज्याच्या मुख्य सचिवपदावरुन निवृत्त झाले.

बढती प्रकरणामुळे कुटेंना मुदतवाढ नाही?

महत्वाची बाब म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला होता. राज्य सरकारतर्फे त्याबाबत स्मरणही करुन देण्यात आलं होतं. अन्य दोन राज्यांच्या मुख्य सचिवांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, कुंटे यांना ही सवलत नाकारण्यात आली. रश्मी शुक्ला यांनी बढती प्रकरणात केलेल्या पत्रव्यवहाराची चौकशी करताना कुंटे हे दोन मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार वागल्याचं सांगितलं जातं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तसा आरोपही केला होता. या घडामोडीनंतर सीबीआयने मुख्य सचिवांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोन वेळा वेगवेगळी कारणं देत ते हजर झाले नाहीत. केंद्रानं याच प्रकरणाची दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरेंकडून कुंटेंची प्रमुख सल्लागारपदी नियुक्ती

दरम्यान, केंद्र सरकारनं सीताराम कुंटे यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना तत्काळ प्रमुख सल्लागार केलं आहे. त्यामुळे सीताराम कुंटे यांच्यावरील उद्धव ठाकरेंचा विश्वास पुन्हा एकदा दिसून आला आहे.

इतर बातम्या :

‘शेतकऱ्यांना वीज बिल भरावं लागेल, फार तर सवलत मिळेल, भाजपनं सवय लावून ठेवली’, ऊर्जामंत्र्यांचा भाजपवर निशाणा

Parliament session:खासदारांच्या निलंबनावरून संसदेबाहेर जोरदार आंदोलन, जया बच्चन यांनी चॉकलेट आणि पापड वाटले

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.