देबाशिष चक्रवर्तींनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला; तर मुख्यमंत्र्यांकडून सीताराम कुंटेंची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती

सीताराम कुंटे यांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे सादर केला होता. मात्र, केंद्राकडून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. संध्याकाळपर्यंत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर करण्यात न आल्यानं अखेर कुंटे यांना निवृत्त व्हावं लागलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला नव्या मुख्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देबाशिष चक्रवर्तींनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला; तर मुख्यमंत्र्यांकडून सीताराम कुंटेंची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती
देबाशिष चक्रवर्तींनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव (Chief Secretary of State) सीताराम कुंटे (Seetaram Kunte) यांचा कार्यकाळ आज संपला आहे. कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला होता. मात्र, केंद्रानं हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यामुळे सीताराम कुंटे राज्याच्या मुख्य सचिव पदावरुन आज निवृत्त झाले. कुंटे यांच्या जागी आता नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला आहे.

सीताराम कुंटे यांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे सादर केला होता. मात्र, केंद्राकडून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. संध्याकाळपर्यंत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर करण्यात न आल्यानं अखेर कुंटे यांना निवृत्त व्हावं लागलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला नव्या मुख्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कुंटे हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अधिकारी

सीताराम कुंटे हे 1985 च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहेत. कुंटे हे मार्च 2021 पासून राज्याच्या मुख्य सचिवपदी होते. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं. तसंच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी मानले जात होते. तसंच कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि सरकारमधील मंत्र्यांसोबतचे चांगले संबंध त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही.

मुख्यमंत्र्यांचा सीताराम कुंटेंवरील विश्वास कायम

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीताराम कुंटे यांच्यावरील विश्वास पुन्हा एकदा दिसून आलाय. कारण, मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले आहेत.

कोण आहेत देबाशिष चक्रवर्ती?

देबाशिष चक्रवर्ती हे 1986 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. चक्रवर्ती यांच्या नियुक्तीबाबत 1 महिन्यापूर्वीच प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. चक्रवर्ती यांना 3 महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे. ते फेब्रुवारी 2022 मध्ये निवृत्त होणार आहेत.

सिंह यांच्यावर कारवाई करण्याचा चक्रवर्ती समितीचा अहवाल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधातील विभागीय चौकशीबाबतचा देबाशिष चक्रवर्ती समितीचा अहवाल राज्य सरकारनं नुकताच स्वीकारला आहे. या समितीने सिंह यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरणात कर्तव्यात कसर केल्याबाबत जबाबदार धरलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई राज्य सरकारकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देबाशिष चक्रवर्ती यांनी सिंह यांना अखिल भारतीय नागरी सेवा नियमांच्या उल्लंघनासाठी जबाबदार धरत अहवाल सादर केला. या समितीने अँटिलिया प्रकरणाच्या हाताळणीतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवलं आहे. मुंबई पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यानं या प्रकरणात सरकारला अंधारात ठेवल्याचं या समितीने म्हटलंय. सेवा नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल सिंह यांच्यावर योग्य कारवाई करण्याची सूचनाही समितीच्या अहवालात करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख, अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

‘केवळ नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी’, भास्कर जाधवांचा पुन्हा एकदा तटकरेंवर हल्लाबोल

Published On - 7:01 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI