Bhiwandi Corona Update | भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमात कोरोनाचा उद्रेक सुरुच, आणखी 17 जण पॉझिटीव्ह

भिवंडीतील (Bhiwandi) त्या वृद्धाश्रमात कोरोनाचा उद्रेक (Corona Update) अद्यापही सुरुये. भिवंडीतील वृद्धाश्रमातील (Old Age Home) आणखी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. दोन दिवसांपूर्वी याच वृद्धाश्रमातील तब्बल 62 जणांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याचं आढळून आलं होतं. आता पुन्हा 17 जणांना कोरोना झाल्याने हा आकडा आता 79 वर पोहोचला आहे.

Bhiwandi Corona Update | भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमात कोरोनाचा उद्रेक सुरुच, आणखी 17 जण पॉझिटीव्ह
Bhiwandi-Matoshree-Old-Age-Home

भिवंडी : भिवंडीतील (Bhiwandi) त्या वृद्धाश्रमात कोरोनाचा उद्रेक (Corona Update) अद्यापही सुरुये. भिवंडीतील वृद्धाश्रमातील (Old Age Home) आणखी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. दोन दिवसांपूर्वी याच वृद्धाश्रमातील तब्बल 62 जणांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याचं आढळून आलं होतं. आता पुन्हा 17 जणांना कोरोना झाल्याने हा आकडा आता 79 वर पोहोचला आहे.

आणखी 17 जण कोरोना पॉझिटीव्ह

भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या सौरगाव (खडवली) येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आणखी 17 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी याच मातोश्री वृध्दाश्रमातील सुमारे 62 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून कोरोनाची लागण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या निकटवर्तीयांचीही कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये 17 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
वृद्धाश्रमातील कोरोनाग्रस्त सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरुये.

भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील खडवली येथे नदी किनारी मातोश्री वृद्धाश्रम आहे. त्या ठिकाणी सुमारे शंभरहून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध नागरिक वास्तव्यास आहेत.

नेमकं काय घडलं?

गेल्या आठवड्यात मातोश्री वृद्धाश्रमातील काही जणांना ताप आल्याची लक्षणे जाणवू लागली होती. उपचार सुरु करुनही एका वृद्धाचा ताप कमी न झाल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह निघाल्याने खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी करण्याचा निर्णय घेतला. मातोश्री वृद्धाश्रमात राहणाऱ्या सर्वांच्या चाचणीनंतर तब्बल 62 वृद्ध नागरिकांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

संबंधित बातम्या :

भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमात कोरोनाचा स्फोट, तब्बल 69 ज्येष्ठ नागरिक कोव्हिड पॉझिटिव्ह

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासाबाबत राज्यात नवी नियमावली; उल्लंघन केल्यास होणार कारवाई

Published On - 7:00 am, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI