Chhagan Bhujbal on Nupur Sharma | नुपूर शर्मांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
नुपूर शर्मांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ते योग्य कारवाई करतील
Chhagan Bhujbal on Nupur Sharma : भाजपने (BJP) निलंबीत केलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वादग्रस्त विधानामुळे देशात वादंग माजला आहे. अनेक ठिकाणी आंदोलने केले जात आहेत. तर अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळन लागत आहे. तसेच देशातील वातावरण ही खराब होत आहे. त्यावर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशाचे मुस्लिम राष्ट्र मित्र नाराज झाले आहेत. तर देशासह राज्यात आंदोलने होत आहे. येथील मुस्लिम जनता नाराज आहे. तर नुपूर शर्मांवर देशात विविध ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आणि त्यावर पोलिस योग्य कारवाई करतील.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

